सांगली / प्रतिनिधी
सरोजिनी दामोदरन फौंडेशऩे , महाराष्ट्र शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२१ अंतर्गत दोन लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या इयत्ता ११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले आहेत.
सरोजिनी दामोदरन फौंडेशन इन्फोसिसचे सहसंस्थापक कुमारी शिबुलाल आणि स.द. शिबुलाल यांनी स्थापन केलेल्या या संस्थेसाठी विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवत आहे. ही शिष्यवृत्ती दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी नावनोंदणी करू शकतात.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना २०२१ या वर्षीच्या महाराष्ट्र, स्टेट बोर्डात इयत्ता १०वी मध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण आणि प्रत्येक विषयात ए प्लस श्रेणी तसेच अपंग विद्यार्थ्यांना ७० टक्के श्रेणी असली पाहिजे. सदर विद्यार्थी हे महाराष्ट्रात शिकत असले पाहिजेत. निवडक विद्यार्थ्यांना इयत्ता ११वी आणि १२वी साठी शिष्यवृत्ती रुपये ६०००/- प्रति वर्षी दिले जातील. जर त्यांची प्रगती दरवर्षी उत्तमोत्तम राहिली तर त्यांच्या आवडीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये १०,००० ते ६०,००० प्रतिवर्षी मिळतील.
जे विद्यार्थी या अटी पूर्ण करत असतील ते www.vidyadhan.org या संकेतस्थळाला भेट देऊन १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज जमा करू शकतात. अधिक माहितीसाठी vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com या ई-मेल आयडीवर अथवा +९१ ९६११८ ०५८६८ या मोबाइल क्रमांक संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








