आरोग्य खात्याचा दावा, बुधवारी सात जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी कोरोनामुळे सात जणांचे बळी गेले असून एकूण मृतांचा आकडा 592 वर पोहोचला आहे. राजधानी पणजीत गेल्या काही दिवसात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून काल 15 नवीन बाधित सापडले. संपूर्ण राज्यात मिळून काल 221 नवे रुग्ण मिळाले असून 196 जण बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. कोरोना मृतांचे तसेच रुग्णांचे प्रमाण कमी जास्त होत असून सरासरीनुसार ते कमी झाल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे.
सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2402 एवढी असून ते विविध इस्पितळ, कोविड सेंटरात उपचार घेत आहेत. संशयित रुग्ण म्हणून 54 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 115 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण 42968 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 39974 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे. डिचोली 75, सांखळी 90, पेडणे 60, वाळपई 45, म्हापसा 91, पणजी 121, हळदोणा 37, बेतकी 34, कांदोळी 113, कासारवर्णे 21, कोलवाळ 88, खोर्ली 88, चिंबल 132, शिवोली 93, पर्वरी 141, मये 19, कुडचडे 38, काणकोण 58, मडगाव 228, वास्को 112, बाळ्ळी 37, कासावली 36, चिंचणी 30, कुठ्ठाळी 97, कुडतरी 90, लोटली 43, मडकई 43, केपे 51, सांगे 33, शिरोडा 27, धारबांदोडा 33, फोंडा 157, नावेली 40.
28 ऑक्टोबरपर्यंतचे एकूण रुग्ण 42968
28 ऑक्टोबरपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 39974
28 ऑक्टोबरपर्यंतचे सक्रिय कोरोना रुग्ण 2402
28 ऑक्टोबरचे नवीन रुग्ण 221
28 ऑक्टोबरचे बरे झालेले रुग्ण 196
28 ऑक्टोबरचे कोरोना बळी 7
आतापर्यंतचे एकूण बळी 592









