क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
हरियाणातील सुल्तानपूर येथील गुडगाव क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या हरियाणाविरुद्धच्या सराव सामन्यात गोव्याला मिश्र यश प्राप्त झाले. पहिल्या टी-20 सामन्यात गोव्याला हरियाणाने 9 विकेट्सनी पराभूत केले तर दुसऱया सामन्यात गोव्याने हरियाणाचा 8 विकेट्सनी पराभव केला. गोव्याचे रणजी संभाव्य क्रिकेटपटू सध्या सराव आणि सामने खेळण्यासाठी दिल्ली आणि हरियाणाच्या दौऱयावर आहेत. गोव्यासाठी फलंदाजीत अमोघ देसाई, सुमिरन आमोणकर, इशान गडेकर, आदित्य कौशिक आणि शुभम रांजणे चमकले.
संक्षिप्त धावफलकः गोवा, 20 षटकात 5 बाद 159 (अमोघ देसाई 39, राजशेखर हरिकांत 10, सुमिरन आमोणकर 48, किनन वाझ 27, विशंभर कॅहलोन 20, समर दुभाषी नाबाद 12 धावा. जयदीप 2-32, वीनीत शर्मा 2-31, हर्षीत 1-30) पराभूत विरूद्ध हरियाणा, 18.5 षटकात 1 बाद 163 (नितीन सैनी नाबाद 61, गुंताश वीर सिंग 80, संजय धूल नाबाद 17 धावा. ऋत्विक नाईक 1-13).
हरियाणा, 20 षटकात 7 बाद 136 (अंकीतकुमार 25, चैतन्य बिष्णोई 25, शिवम चौहान 19, रोहित शर्मा 44, पियुष दहिया नाबाद 10, लक्षय गर्ग 2-39, दर्शन मिसाळ 2-15, निहाल सुर्लकर 1-30) पराभूत विरूद्ध गोवा, 16.4 षटकात 2 बाद 137 (इशान गडेकर 42, आदित्य कौशिक 60, शुभम रांजणे नाबाद 28 धावा. टिनू कुंडू 1-34).








