वांगी / प्रतिनिधी
स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त वांगी, ता. कडेगाव ग्रामपंचायतीकडून
आदरांजली वाहण्यात आली. गावातील ग्रामस्थनी प्रतिमेचे पूजन करून फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषदेचे सुरेश मोहिते म्हणाले. हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खान विरुद्धच्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारतीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली. ज्या लढाई मध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहते यांनी स्वत:हून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवीत शत्रू सैन्याचा पराभव केला.
त्यांचा हा पराक्रम पाहून हंबीरराव मोहिते यांची सरनेनापती म्हणून निवड केली, सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला आणि हंबीरराव मोहिते झाले. अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती झाले. हंबीररावांची शेवटची लढाई म्हणजे वाईजवळील मुघल सरदार सर्जाखान विरुद्धची लढाई होय. या लढाईत देखील आपल्या कर्तुत्वाला साजेसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लागून स्वराज्याचे सरसेनापती हंबीर राव मोहिते धारातीर्थी पडले. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा, पण त्यांनी आपला अमुल्य हिरा मात्र गमावला.
यावेळी शामराव मोहिते, पोपट मोहिते, नाथाजी मोहिते, केशव मोहिते, दिलीप मोहिते, राजेंद्र मोहिते, अभीजीत देशमुख, संजय मोहिते. यशंवत मोहिते. मोहन मोहिते, अनील मोहिते उपस्थीत होते.








