ऑनलाईन टीम / नागपूर :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. या पार्श्भूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येत्या रविवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी संघ स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ट्विट द्वारे देण्यात आली.
या वेळी मोहन भागवत वर्तमान स्थिती आणि आमची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आणि हे मार्गदर्शन ऑनलाईन असणार आहे.
त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, आशा आहे की, आपण सर्व जण ठीक असाल. सध्या पूर्ण जगावर कोरोना संकट आले आहे. आपल्या देशात देशात देखील चिंताजनक स्थिती आहे. हे संकट गंभीर असले तरी समाजातून मिळणारा प्रतिसाद ही उत्तम आहे. या संकट काळात ही आपला भारत देश संपूर्ण जगासमोर उत्तम उदाहरण म्हणून उभा आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरच्या वतीने ह्या बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मोहन भागवत राष्ट्रीय स्वयं संघाच्या अधिकृत पेज वरून आणि यूट्यूब च्या माध्यमातून स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत, असे संघाने म्हटले आहे.









