दोडामार्ग – वार्ताहर-
सरपंच पदाची धुरा सदस्यांनी नाही तर लोकांनी आपल्या हाती दिली होती. आता जरी शासनाचा धोरण बदलले असले तरी लोकनियुक्त सरपंच म्हणून २०१८ ची बॅच सदैव स्मरणाथ राहील. गावाच्या विकासाला प्रतिनिधी म्हणून आम्हां सरपंचाना लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिले त्या विश्वासाला माझे सरपंच व बंधू भगिनी सार्थकी ठरले. तसेच हे जे आम्ही तालुका ठिकाणी सरपंच कार्यालय सुरू केले आहे हेच तालुक्याचे विकासाचेही केंद्रस्थान बनेल असे गौरोदगार सरपंच सेवा संघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रवीण परब यांनी काढले .
दोडामार्ग येथे सरपंच कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. दोडामार्ग भेडशी रोडवर स्नेहरेसिडेंसी येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परब यांनी सरपंचांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतूक केले. गावाबरोबरच तालुक्यातील अनेक प्रश्नांना आपले सरपंच वाचा फोडीत आहेत. आणि, ते प्रश्नही तडीला लागत आहेत हे अभिमानास्पद आहे. २०१८ जे आम्ही सरपंच म्हणून कार्यभार हाती घेतला तो लोकणाच्या मताधिक्यावर. आपली सदस्यांतून निवड न होता लोकांनी निवड केली होती. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. या विश्वासाला माझे सर्व सहकारी सार्थकी ठरले असे गौरोदगार प्रविण परब यांनी काढले तर जिल्हा संघटक प्रवीण गवस म्हणाले की, सर्वानीच गावाबरोबरच तालुक्याचाही विकास साधणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडणे हे आद्य कर्तव्य आहे. असे त्यांनी सूतोवाच काढले.









