वृत्तसंस्था/काठमांडू
नेपाळमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे गदारोळ निर्माण झाला आहे. 2012 मध्ये पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या डीआयजीला (पोलीस महासंचालक) कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. परंतु सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर राणा यांनी गुन्हेगाराची उर्वरित शिक्षा माफ केली होती. डीआयजी रंजन कोईराला हे सरन्यायाधीशांचे मित्र असल्याचे समजते. या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोकांनी सरन्यायाधीशांवर महाभियोग चालविण्याची मागणी केली आहे.
डीआयजी कोईराला यांच्यावर पत्नी गीताची हत्या आणि मृतदेह जाळल्याचा आरोप झाला होता. कौटुंबिक कलहातून कोईराला यांनी काठमांडूच्या शासकीय निवासस्थानात गीता यांची गळा दाबून हत्या केली होती. मृतदेहाचे तुकडे करून कोईराला यांनी ते जंगलात जाळले होते.









