ऑनलाईन टीम
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. सरनाईक यांनी या पत्रात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेने भाजपशी जुळवून घेण्याची विनंतीही सरनाईक यांनी केली आहे. भाजपशी जुळवून घेतल्यास आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
“प्रताप सरनाईक यांनी जर पत्रातून काही मत मांडलं असेल तर त्यात प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही. त्यांच्या पत्रात एक महत्त्वाचं वाक्य आहे की शिवसेनेच्या काही नेतेमंडळींना विनाकारण त्रास दिला जातोय. कोण, कोणाला आणि का विनाकारण त्रास देत आहे हा या पत्रामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात आमचा अभ्यास सुरू आहे”, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
राऊत यांनी शिवसेनेच्या काही नेतेमंडळींना विनाकारण त्रास दिला जात असलेल्या या मुद्यावर ही प्रतिक्रिया दिल्याने यावर भाजप नेत्याकडूनही याला प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे.
Previous Articleमाननीय आदित्य दादा, त्यांना त्यांच्या घराबाहेर काढू नका
Next Article एसएसएलसी परीक्षा: नवीन मार्गदर्शक तत्वे जारी








