ऑनलाईन टीम / मुंबई
विकी कौशलच्या (Vicky Koushal) चाहत्यांनी सरदार उधम (Sardar Udham) 94 व्या ऑस्कर(Oscar) पुरस्कारांसाठी या चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक, शूजित सरकार (Shoojit sirkar)यांना वाटते की चित्रपटाची निवड न करण्याचा ज्युरीचा निर्णय व्यक्तिनिष्ठ असुन त्याचा आदर केला पाहीजे.ज्युरींच्या मते हा चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष निर्माण करतो.
सरदार उधम यांना ऑस्करसाठी का पाठवले गेले नाही हे सांगताना, ज्युरी सदस्यांपैकी एकाने असे मत व्यक्त केले की हा चित्रपट “ब्रिटिशांबद्दलचा आपला द्वेष दाखवतो” आणि “जालियनवाला बाग हत्याकांडाच्या आठवणी जागृत करतो .अलीकडेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरकर म्हणाले, “हे एक वैयक्तिक मत आहे,त्यावर माझे कोणतेही भाष्य नाही. मी ज्युरी आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. ऑस्करसाठी जो चित्रपट निवडला गेला, त्याबद्दल आणि तो निवडला गेल्याबद्दल मला आनंद आहे.”
सरदार उधम हे भारतीय क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्यावर आधारित आहे. अमृतसरमधील जालियनवाला बाग (Jaliyanwala Bagh)हत्याकांडाच्या वेळचे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर यांची हत्या करुन जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कसा घेतला हे दाखवले गेले आहे . या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत असुन ऑस्करसाठी भारताच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी या चित्रपटाची निवड का करण्यात आली नाही हे ज्युरी सदस्यांनी स्पष्ट केले आहे. ब्रिटिशांबद्दलचा आपला द्वेष दाखवतो’.
इंद्रदीप दासगुप्ता, या वर्षी ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशाचा निर्णय घेणार्या ज्युरीचे सदस्य आहेत. एका अग्रगण्य दैनिकाला म्हणाले, “सरदार उधम हे जालियनवाला बाग घटनेनर तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका नायकावर भव्य चित्रपट बनवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पण या प्रक्रियेत ते पुन्हा आपल्या ब्रिटीशांप्रती द्वेष व्यक्त करते. जागतिकीकरणाच्या या युगात हा द्वेष धरून राहणे योग्य नाही. चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय मानकांनुसार चालते” या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीचे त्यांनी कौतुक केले.
ज्युरीचे आणखी एक सदस्य, सुमित बसू यांनी देखील सांगितले की, “कॅमेरावर्क, एडिटिंग, ध्वनी डिझाइन आणि त्या काळातील चित्रण यासह सिनेमाच्या गुणवत्तेसाठी सरदार उधम अनेकांना आवडतो. चित्रपटाची लांबी हासुद्धा एक मुद्दा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांची खरी वेदना जाणवण्यासाठी दर्शकाला खूप वेळ लागतोय.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








