ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सरकार कडून एक ॲप तयार करण्यात आले आहे. ‘आरोग्य सेतू’ असे या ॲप चे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे ॲप नॅशनल इन्फॉमेटिक्स सेंटरकडून लॉन्च करण्यात आले आहे.
या ‘आरोग्य सेतू’ ॲप च्या माध्यमातून कोरोना व्हायरस ची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन होणार आहे.
नॅशनल इन्फॉमेटिक्स सेंटर च्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितले की, या ॲप मुळे कोविड -19 संक्रमणा बाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशन बाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला मदत होईल.
हे ॲप कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचे काम करेल. तसेच हे ॲप युझर च्या ब्लूटूथ, मोबाईल नंबर आणि लोकेशन वरून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आला तर नाही ना? या गोष्टी ट्रेस करेल. तसेच हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. असं ही त्या यावेळी म्हणाल्या.