ग्रंथपालांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी ग्रंथालयांची वेळ वाढवावी, नवीन ग्रंथपालांच्या जागा भरणे, ग्रंथपाल माहिती साहाय्यकांना वेळेत वेतन देणे आदी मागण्यांसाठी बेळगाव जिल्हा सरकारी ग्राम पंचायत ग्रंथपालांनी विधानसौध परिसरात आंदोलन छेडले.
ग्रंथपालांना किमान वेतन देण्यासाठी ग्रंथालयाची वेळ वाढवावी, यामुळे वाचकांनादेखील याचा लाभ होणार आहे. याबाबत माहिती साहाय्यक केंद्राकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्याप आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणी ग्रंथपालांच्या जागा रिक्त असूनदेखील भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे ग्रंथालये बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ग्रंथपालांच्या जागा तातडीने भराव्यात. याबरोबरच ग्रंथपाल आणि माहिती साहाय्यकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत वेतन देण्यात यावे, अशी मागणीदेखील जिल्हा नोकर ग्राम पंचायत ग्रंथपालांनी केली आणि याबाबतचे निवेदन सादर केले.









