अटक नसल्यामुळे भुमी उपअधिक्षक कार्यालयाचे काम बंद
वार्ताहर/ पाचगणी
महाबळेश्वर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय पिसाळ यांनी .महाबळेश्वर भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातीत कर्मचारी रविंद्र फाळके यांना जागेच्या मोजणी कामी चुकीच्या हद्दी दाखवुन काम करत असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक संजय पिसाळ यांनी मारहाण केली . बेदम मारहाणीमुळे जखमी भुमी अभिलेख उप अधिक्षक कार्यालयाचे कर्मचारी वाई येथील साई गणेश हास्पीटल येथे अतिदक्षता विभागात तात्काळ दाखल करण्यात आले आहेत .रविंद्र फाळके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन महाबळेश्वर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक संजय पिसाळ. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असुन.गत चार दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल होवुनही अद्याप माजी नगरसेवक संजय पिसाळ यांना अटक न करण्यात आल्यामुळे उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचायानी काळ्या फिती लावुन कामबंद आदोलन सुरु केले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहीतीवरुन तापोळा ता महाबळेश्वर येथील सर्वे नंबर 10/3 जमिनीच्या हद्दीच्या खुणा कायम करण्याकरीता दुपारी अडीच वाजता महाबळेश्वर भुमी अभिलेख कार्यालयातून रविंद्र फाळके ,दिपक मांढरे दोघे मोजणी कामी पोहचलो असताना .राहुल पिसाळ व त्यांचे भाऊ संजय पिसाळ हे सदर ठिकाणी आले व रविंद्र फाळके याच्याकडे पाहुन प्रकरणाचा नकाशा मला दाखवा असे म्हणाले असता .रविंद्र फाळके यांनी नकाशा दाखवला असताना तुम्ही चुकीच्या हद्दी दाखवत असुन खोटे काम करीत आहेत असे संजय पिसाळ म्हणाले .मी त्यांना माझे काम शासकीय नियमाप्रमाणे चालले आहे असे म्हणाले असता व त्यांना हद्दीचे काम दाखवत असताना त्यांनी मला तु चुकीचे काम करीत आहेस कार्यालयीन वेळेनंतर शासकीय कर्मचारी नसतो तुला बघतो असे म्हणुन मला शिवीगाळ दमदाटी करुन हाताने माझ्या कानशिलात व डोकेवर मारहाण केली व हद्द कशी दाखवतोस मी सदरचे प्रकरण सोबत घेवुन गेला मी भुमी अभिलेख कार्यालयात काम करीत असुन तापोळा सर्वे नबंर 10/3 मधील जमीनीच्या हद्दीच्या खुणा कायम करण्यासाठी मी माझे शासकीय काम करत असताना संजय पिसाळ यांने रविंद्र फाळके यांना हातपाय तोडण्याची धमकी देवुन माझे कानसुलात व डोकीत हाताने मारहाण केली .व सदरचे प्रकरण घेवुन गेला .याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक संजय पिसाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दरम्यान उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय महाबळेश्वर सचिन वाघ याच्यासह भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचायानी काळी फित लावुन अद्याप माजी नगरसेवक संजय पिसाळ यांना अटक न केल्यामुळे कामबंद ठेवले असल्याचे आज भुमी अभिलेख कार्यालयात दिसुन आले . कर्मचायाला मारहाण प्रकरणी माजी नगरसेवक संजय पिसाळ याला अटक व झाल्यास संपुर्ण जिल्हाभर कर्मचारी आदोलन छेडतील असा इशारा उपअधिक्षक सचिन वाघ यांनी दिला आहे








