ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रोहिंटन नरीमन यांनी देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यासंदर्भातील मत व्यक्त केलंय. त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात हा कायदा वापरला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. सरकारच्या टीकाकारांविरोधात हा कायदा वापरला जात असल्याचा संदर्भ देत देशद्रोहासंदर्भातील कायदा संपुष्टात आणण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला पूर्ण परावनगी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं न्या. नरीमन यांनी म्हटलंय.
माजी न्यायमूर्ती न्या. नरीमन यांनी मुंबईत १४ जानेवारी रोजी डीएम हरीश स्कूल ऑफ लॉच्या उद्घाटन प्रसंगी एका कार्यक्रमामध्ये बोलताना यांनी सडेतोड शब्दांमध्ये आपलं मत व्यक्त केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरुन खटले दाखल केले जात आहेत. मात्र त्याचवेळेस चुकीची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नसल्याचं न्या. नरीमन यांनी म्हटलं आहे.









