प्रतिनिधी / शिरोळ
राज्य सरकारनं साखर कारखान्याची कर्जे माफ करून थक हमीचे 3 हजार कोटी कर्ज फेडण्यासाठी पैसे आहेत. पण पूरग्रस्त नागरिकांना देण्यासाठी पैसे नाहीत. हे धादांत खोटे आहे. या आघाडी सरकारमधील जिल्ह्याच्या मंत्र्यांनी ही पूरग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला गुडघे टेकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 23 तारखेला होणारे आंदोलन हे सरकारला गुडघे टेकवायला लावणारे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालय येथे शिरोळ तालुका पुरग्रस्त अन्याय निवारण समितितर्फे सुरू असलेल्या आंदोलनस्थळाला भेट देऊन पाठींबा दिला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सोनाळी येथील कुमार वरद याची अमानुष हत्येच्या घटनेचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, प्रत्येक वर्षी येणाऱ्या शिरोळ तालुक्यावर येणाऱ्या महापुराचे संकटाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. आम्ही प्रत्येक वर्षी आंदोलन करून तुमच्याकडे भीक मागत बसणार नाही. राज्य सरकारने बारा हजार कोटीचे पॅकेज दिलं आहे. मात्र त्यात साडेपाचशे कोटी रुपयांचीच शेतकऱ्यांसाठी तरतूद करून हा शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. धोरणाचे नाव पुढे करून साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाला राज्य सरकारने दिलेल्या थक हमी पोटी 3 हजार कोटी रुपये दिले. याचबरोबर मास्क आणि पि.पि.ई किट खरेदीत ही मोठा भ्रष्टाचार केल्याचा ही आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी आंदोलनस्थळी अनिरुद्ध कोळी यांच्या गोंधळ पथकाने अंबाबाईचा गोंधळ घालत थेट सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे सईद पिरजादे, माऊली महिला संस्थेच्या भाग्यश्री अडसूळ व शिरटी ग्रामपंचायती सतीश चौगुले, राहुल सूर्यवंशी यांनी पत्र देत पाठींबा दिला. यावेळी पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार विनोद पुजारी यांनी मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









