नवी दिल्ली
ऑनलाइन क्षेत्रातील कंपनी फ्लीपकार्टची भारतात खाद्यपदार्थ उद्योग (फूड रिटेल) उभारण्यासाठीची परवानगी सरकारने नाकारली आहे. सरकारच्यावतीने उद्योग विस्तार आणि अंतर्गत व्यवसाय विभागाच्यावतीने याबाबतची माहिती नुकतीच देण्यात आली. भारत सरकार भारतातच निर्मिती करणाऱया उद्योगात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूक करण्यासाठी परवानगी देते. किराणा साहित्याच्या व्यवसायाचा वाटा भारतात मोठा आहे. असंघटीत क्षेत्राचा विचार करता भारताची बाजारपेठ 200 अब्ज डॉलरची असल्याचे सांगण्यात येते. मागच्या वर्षी फ्लीपकार्टने भारतात खाद्य उद्योगात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. याला अनुसरून या उद्योगाकरीता परवाना देण्यासंदर्भातली मागणी फ्लीपकार्टकडून करण्यात आली होती. पण सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे.









