प्रतिनिधी / पणजी
मुक्ति दिनानिमित्त पणजीत आयोजित कार्यक्रमा दरम्यान काही युवकांना काहीही न सांगता ताब्यात घेऊन डॉ. प्रमोद सावंतच्या सरकारने आपली पूर वृत्ती दाखवून दिली आहे. त्यांची ही वृत्ती पोर्तुगीज हुकूमशाहीशी पूर्णपणे जुळत होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत इतक्या खालच्या स्तरावर जाऊ शकतो हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिले. असे आपचे संदेश तेळेकर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
या कृत्यामध्ये मुलांना त्यांच्या आईवडिलांपासून वेगळे करण्यात आले. व त्या तरुणांना रात्री उशिरा सोडण्यात आले. पालकांना याबाबत काहीच माहीत नव्हते. तसेच ताब्यात घेतलेल्यांमध्ये अनेक युवती होत्या त्यांना देखील ताब्यात घेताना फक्त एकच महिला काँन्स्टेबल तेथे होती. त्यामुळे सरकार कीतीप्रमाणात बेकायदेशीररीत्या वागत आहे हे दिसून येते. असे तेळेकर यांनी पुढे सांगितले.
मुख्यमंत्री हे वैद्यकीय व्यवसायात आहे. त्यामुळे या तरुणांना काय त्रास सहन करावा लागला असेल आणि मुख्य म्हणजे त्यांचे पालक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे समजले पाहिजे. पण गोमंतकीय या गोष्टीला वेळ आल्यावर योग्य उत्तर देईल असेही तेळेकर यांनी पुढे सांगितले.









