ऑनलाईन टीम/मुंबई
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ सुरु झाला. एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरले. तर अनिल देशमुखांच्या चौकशीचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. मुनगंटीवार यांनी देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.
विधानसभेचं कामकाज परंपरेनुसार झालं पाहिजे असं सांगत सुधीर मुनगंटीवार नियमांचा दाखला देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे मुनगंटीवार संत्तप्त होत अनिल देशमुख असे मधेच बोलले होते, आता आतमध्ये जात आहेत. तुम्ही मधे बोलू नका, काही कारण नाही सरकारची चमचेगिरी करण्यासाठी असं वक्तव्य केलं.
मुनगंटीवार यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरकत घेतली. “मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांनी असाच विरोध केला म्हणून जेलमध्ये जात असल्याचं म्हटलं आहे. हे काय धमकी देत आहेत का ? सभागृहात धमकी दिली जात आहे. काय सुरु आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








