प्रतिनिधी/ पणजी
सरकारची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमोडली असून राज्याच्या तिजोरीत महसूल वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे सध्या राज्यात आर्थिक मंदी आली असून सर्वच क्षेत्रात हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप मगो पक्षाचे नेते माजी सांबाखा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
राज्याच्या सांबाखा खात्यामध्ये महसूल नसल्याने रस्त्याचे दुरुस्ती काम झालेले नाही. सांबाखा खात्याला 500 कोटीची गरज आहे हा फंड मिळालेला नाही तरी सार्वजनिक मंत्री फक्त रस्ते सुधारण्याचे अश्वासने देत आहे, प्रत्येकक्षात काहीच नाही सांबाखा खाते पूर्णपणे कोलमोडले आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात महसूल मिळवून देणारे वाहतूक खाते आर्थिक मंदीत आहे. सरकारने 50 टक्के रस्ता कर कमी करुन सरकारी तिजोरीवर घाला घातला आहे. याचा फायदा लोकांना नाही तर वाहतूक विक्रेत्यांना झाला आहे. त्यांच्या भल्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारला करोडो रुपयांना मुकावे लागत आहे, असा अरोपही यावेळी ढवळीकरांनी केला.
‘सेझ’ जमिनीचा लिलाव नको
सरकारने जो राज्यातील सेझ जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. तो चुकीचा आहे. प्रथम लोकांना त्या जाग्यावर कसल्या कंपनी येणार तसेच त्यांचा लोकांना काय फायदा होणार हे पटवून दिला पाहिजे. उगाच सरकारच्या जमिनी विकू नये. या लिलावामुळे मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो. सरकार आपल्या मर्जीतील लोकांना कमी किंमतीत जागा देऊ शकतो. सरकारने आयटी पार्क जाग्याचा लिलाव करुन पैसे घेतले सरकार फक्त जमिनी विकण्याचे काम करत आहे. पण प्रत्येक्षात बेरोजगारी कमी झाली नाही. तसेच अर्थिक स्थिती वाढली नाही. त्यामुळे सेझ लिलावाचा काहीच फायदा होणार नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करणे गरजेचे आहे.
नवीन साखर कारखान अशक्य
सहकार मंत्र्यांनी नवीन साखर कारखाना बांधण्याच जे शेतकऱयांना आश्वासन दिले आहे ते शक्य नाही. मी आव्हान करतो या मंत्र्यांना त्यांनी हा साखर कारखान सुरु करुन दाखवावा. या कारखान्याला 3.5 कोटी खर्च करुन तो दुरूस्त करणे गरजेचे होते. आता करोडो रुपये खर्च करुन हा कारखाना बांधणे म्हणजे शेतकऱयांची फसवणूक करणे आहे. हा मंत्री स्वाताच्या फायद्यासाठी हे करत आहे. त्याला लोकांचे शेतकऱयांचे काहीच पडले नाही म्हणूत जेव्हा दुध वाढल्यावर सामान्य लोकांनी आवाज केल्यावर त्यांचा आवाज दाबला जात आहे. सहकार क्षेत्र पूर्णपणे कोलमोडले आहे असे यावेळी ढवळीकर यांनी सांगितले.









