प्रतिनिधी / फोंडा
सम्राट क्लब कपिलेश्वरीचा अधिकारग्रहण सोहळा रविवार 27 सप्टें. रोजी सायं. 6 वा. कुरतरकरनगरी फोंडा येथील किडस् नेस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी क्लबचे नूतन अध्यक्ष प्रशांत नाईक व सन् 2020-21 साठी निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीला शपथ देण्यात येईल.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट क्लब इंटरनॅशनल 1 चे अध्यक्ष प्रसाद नाईक तर सन्माननीय पाहुणे म्हणून विद्या वृद्धी संस्थेचे अध्यक्ष उदय डांगी व सम्राट क्लब इंटरनॅशनल विभाग 1 चे अध्यक्ष रामा परब हे उपस्थित राहणार आहेत. सम्राट कपिलेश्वरीची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष प्रशांत चंद्रकांत नाईक, सचिव जयंत कवळेकर, कोषाध्यक्ष रत्नदीप नाईक, कार्यकारिणी सदस्य मावळते अध्यक्ष निलेश नाईक, उपाध्यक्ष ममता बदामी, शर्मिला प्रभूदेसाई, सदस्य राजेंद्र कारेकर, किशोर नाईक, नितीन ढवळीकर, रतिश नाईक, निर्मेश त्यागी, सुलभा तेंडुलकर, संजय फोंडेकर. सल्लागार पंढरीनाथ बोडके, सुधाकर नागेशकर, अशोककुमार शिंक्रे.









