अमेरिकेत आहे हे अनोखे गाव
स्वर्गलोक आणि पाताळलोकाच्या कहाण्या अनेकदा ऐकल्या असतील. या दोन्ही ठिकाणांपैकी स्वर्ग आकाशात तर पाताळ जमिनीत वसलेले असल्याचे मानले जाते. परंतु त्याच्या अस्तित्वाचा अद्याप पुरावा सापडू शकलेला नाही. पण अमेरिकेतील एक गाव समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट खोलीवर वसलेले आहे.

अमेरिकेच्या ग्रँड केनियनच्या हवासू केनियनचे सुपाई गाव हे जमिनीपासून 3 हजार फूट खाली वसलेले आहे. जणू पाताळलोकात वसलेले असल्याने दरवर्षी सुमारे 55 लाख पर्यटक येथे येत असतात. हे गाव खोल दरीत वसलेले आहे. येथे राहणाऱया लोकांना रेड इंडियन म्हटले जाते. सध्या या गावात सुमारे 208 लोक राहत आहेत. या गावात ये-जा करण्यासाठीची साधने अत्यंत कमी आहेत. हे गाव जमिनीखाली वसलेले असल्याने ते जगापासून तुटलेले आहे.
आजच्या काळातही येथील लोक येथे येण्यासाठी घोडय़ांचा वापर करतात. तर काही लोक येथे येण्यासाठी विमानाची मदत घेतात. गावानजीक महामार्ग देखील आहे. येथे इंटरनेट असल्याने अजुनही पत्रांचा वापर करण्यात येतो. हे गाव चारही बाजूने उंच पर्वतांनी घेरलेले आहे. येथील लोक पाण्याला पवित्र मानतात. येथे मिळणाऱया पाण्यातूनच समुदायाचा जन्म झाल्याची मान्यता आहे. येथील लोक हवासुपाई भाषा बोलतात. रोजगारासाठी टोपल्यांची निर्मिती करत त्या जवळच्या शहरांमध्ये विकण्याचे काम लोक करतात.









