मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधला आहे. त्यांनी एनसीबीवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे. तसेच, एनसीबीकडून देखील मागील तारखांच्या पंचनाम्यांवर पंचांच्या सङ्या घेऊन पंचनामे बदलण्याचे प्रकार केले जात असल्याचं ते म्हणाले. यासाठी त्यांनी एक एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्यातल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील पत्रकार परिषदेत ऐकवली.
दरम्यान, फर्जीवाडा करून लोकांवर खोटे आरोप लावले, लोकांना अडकवण्यात आलं असं म्हणत नवाब मलिक यांनी आज एक ऑडिओ क्लीप समोर ठेवली आहे. यामध्ये दोन व्यक्ती एका प्रकरणावर बोलत असल्याचं समजतंय. त्यानुसार या प्रकरणात कशा पद्धतीनं खोटे पंच उभे करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तसेच भाजपचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी लॉबिंग करत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या दोन वेगवेळ्या ऑडिओ क्लिपमध्ये एक किरण बाबू नावाचा अधिकारी आणि दुसऱ्यांदा समीर वानखेडे एका मॅडी नावाच्या व्यक्तीला पंच बनण्यासाठी बोलत असल्याचं दिसतंय. कार्यालयात येणं अडचणी ठरेल म्हणून बाहेर भेटण्यास सांगत आहेत. समीर वानखेडेंना जेव्हा तो मॅडी नावाचा पंच विचारतो की, ‘या प्रकरणात आधीच एवढ्या अडचणी सुरू आहे. काही होणार तर नाही ना?’ तेव्हा समीर वानखेडे म्हणतात की बिनधास्त जाऊन भेट असं या ऑडिओ क्लिपमधून समोर येत असल्याचं नवाब मलिक म्हणाले.