प्रतिनिधी / बेळगाव

होसूर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व मराठा युवक मंडळ यांच्यावतीने म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला 11 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. प्रशांत भातकांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 2100 रुपये सेंटरला दिले.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते जोतिबा शहापूरकर, प्रशांत भातकांडे, सोमनाथ सैनुचे, अनिल मुतकेकर, अनंत भातकांडे, प्रताप भातकांडे यांनी समितीचे कार्यकर्ते शुभम शेळके, मदन बामणे, दत्ता जाधव, बाळू जोशी, अंकुश केसरकर, सागर पाटील यांच्याकडे मदत सुपूर्द केली.
मच्छे येथील ग्रामस्थांची मदत
मच्छे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत आयसोलेशन सेंटरला आपापल्यापरीने आर्थिक मदत देऊ केली. गजानन बेळगावकर, विरोचन अनगोळकर, परशराम कणबरकर, संजू हलगी, यल्लाप्पा कणबर्गी, उदय चौगुले, बबन नेसरकर, विनायक छापरे, विनायक घाडी, प्रकाश कणबर्गी, परशराम सनदी, अमित कानकुले, घनःशाम बागेवाडीकर, दीपक सनदी, मार्व्हलस मच्छे, अमोल लाड, संभाजी कणबरकर, नारायण नावगेकर यांनी आर्थिक मदत देऊ केली.
बेननस्मिथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची मदत
बेननस्मिथ हायस्कूलच्या 1986 दहावी बॅचने म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. हायस्कूलचे माजी विद्यार्थी ऍड. शामसुंदर पत्तार, सुनील मुरकुटे, अमर कारेकर, राजू लोंढे, संजय मोरे, दिगंबर प्रभू, प्रमोद केसरकर, हागिदाळे, विश्वनाथ बड्डे, परशराम जाधव, सुनील गुडमेट्टी यांनी समिती पदाधिकाऱयांकडे आर्थिक मदत दिली.









