प्रतिनिधी /येळ्ळूर
आजी-माजी सैनिक 12 मराठा लाईट इन्फंट्री यांच्यावतीने समाजसेवा पुरस्कार येळ्ळूर सैनिक सोसायटीचे चेअरमन बाबुराव मुरकुटे यांना देण्यात आला. त्याबद्दल येळ्ळूर येथील शेतकरी विकास कृषी पत्तीन सोसायटीवतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन प्रदीप देसाई आणि संचालक दौलत कुगजी यांच्यासह इतर संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
बाबुराव मुरकुटे यांनी सैन्यदलात सेवा बजावून ते निवृत्त झाले. त्यानंतर येळ्ळूर गावामध्ये निवृत्त सैनिकांना एकत्र करून सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले. निवृत्त जवानानी केलेल्या कार्याची दखल घेऊन मराठा लाईट इन्फंट्रीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे प्रदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन विलास नंदी, सोसायटीचे संचालक डी. जी. पाटील, भोला पाखरे, श्रीधर कानशिडे, राजू डोण्यान्नावर, यल्लोजी तोपिनकट्टी, अभिजीत पाटील, मधु पाटील, नंदू पाटील, हणमंत पाटील, परशराम कंग्राळकर, जोतिबा पाटील, अजित गोरल, दीपक कर्लेकर यांच्यासह इतर संचालक व कर्मचारी उपस्थित होते.









