नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना बुधवारी दुपारच्या सुमारास गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 81 वर्षांचे असलेले ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना वृद्धापकाळामुळे जाणवणाऱ्या त्रासावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलायम सिंह यादव पाठिमागील काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाठीमागील वर्षी मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाठिमागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलायम सिंह यादव हे कोरोना व्हायरस संक्रमितही झाले होते. त्यांचे चिरंजीव आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करुन याची माहिती दिली होती.
मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशातील एक मोठे नेते आहेत. ते तीन वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी राहिले आहेत. 1 जून 1996 ते मार्च 1998 या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रालय सांभाळले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









