प्रतिनिधी / कोल्हापूर
शिक्षणातील विविध समस्या बरोबरच शारीरिक शिक्षणातील महत्त्वाच्या प्रश्नाबाबत लक्ष घालण्यासाठी कटिबद्ध आहे. अशी ग्वाही नूतन शिक्षक आमदार प्रा .जयंत आजगावकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्यातर्फे आमदार प्रा. जयंत आजगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा. आसगांवकर म्हणाले, कोरनासारख्या रोगाने जगाला हैराण करून सोडले आहे. यावर मात करण्यासाठी शरीर सदृढ असणे व रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हाच पर्याय आहे. हे सिद्ध झाले असून .हेच शिक्षण शारिरिक शिक्षणाद्वारे मुलांना दिले जाते. यासाठी शिक्षणामध्ये चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक शिक्षण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. या विषयावर लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी योग्य ते बदल करणे गरजेचे आहे, असे आमदार आसगांवकर यांनी सांगितले. यावेळी नूतन आमदार प्रा. जयंत आजगावकर यांचा अध्यक्ष आर .डी .पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक एस,डी लाड, एस .डी. सूर्यवंशी, डी,एस घुगरे, शेखर शहा, महेश सूर्यवंशी, राजेंद्र बुवा, राजेंद्र बनसोडे, दिलीप राऊत, प्रदीप साळोखे, पंडित साळोखे, शंकर पवार, विवेक हिरेमठ, संदीप पाटील, अश्विनी पाटील आदींसह पदाधिकारी, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. आभार सचिव संदीप पाथरे यांनी मानले.









