
- मराठीत ऱ्हुमेटाइड आर्थ्रायटिसला संधीवात म्हटले जाते. या आजाराविषयी सुरूवातीला माहिती होत नाही. परंतु काही लक्षणे निश्चितच जाणवतात. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने ही लक्षणे दिसून येतात. यामध्ये हाडे आणि हृदयातील रक्तवाहिन्यांची झीज होते.
- लक्षणे : थकवा, ऊर्जेची कमतरता, भूक न लागणे आणि सांध्यांमध्ये वेदना अशी लक्षणे जाणवतात. र्हुमेटाइड आर्थायटिसच्या रूग्णांमध्ये ऍनिमिया आणि थायरॉइडची लक्षणे दिसून येतात.
- याची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना चार प्रकारच्या पद्धती अवलंबाव्या लागतात. सकाळी उठल्याउठल्या
सांध्यामध्ये वेदना होणे किंवा सांधे आखडून जाणे, हे आखडलेपण कमीतकमी एक तास तरी राहते. एकाच वेळी तीन सांध्यामध्ये सूज येते किंवा पाणी धरते. मनगट, हात आणि बोटांच्या सांध्यामध्ये सूज. शरीराच्या दोन्ही भागामध्ये समान सांध्यामध्ये वेदना. त्वचेवर रॅशेस उठणे हे एक मोठे लक्षण मानले जाते. कित्येकदा त्वचेच्या खाली तंतुंची गाठ निर्माण होते. - तपासणी : याच्या तपासणीसाठी डॉक्टर शारीरिक लक्षणांवर जास्त भर देतात. रक्तातील आरए म्हणजे र्हुमेटॉइड फॅक्टरची तपासणी केली जाते.
- उपचार पद्धती : या आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्यावीतच. पण त्याजोडीला फिजिओथेरपीस्टची मदत घेणे देखील फायदेशीर ठरेल. यावर प्रदीर्घ काळापर्यंत उपचार घ्यावे लागतात. आपल्या शारीरिक स्थितीनुसार आहाराचा तक्ता बनवून घ्या. योग्य उपचारासोबतच योग्य खाणे पिणे देखील तितकेच महत्वाचे आहे.









