बेळगाव : बकरी मंडई येथील श्री समर्थ बचत गटातर्फे गरजू महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. क्लोजडाऊन काळात अनेकांना जीवनावश्यक साहित्य वेळेत मिळत नसल्याने गोरगरिबांचे हाल होत आहेत. अशा संकट काळात बचत गटातील शिल्लक रक्कम गोरगरीब महिलांच्या उपयोगी पडली आहे. यावेळी संसारोपयोगी साबण, तेल, कोलगेट, सॅनिटायझर, साखर, चहापावडर, डाळी आदी साहित्य महिलांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा शीतल प्रभावळकर, रेणुका गवळी, सुनीता गतगळे, शिरिन कल्याणी, मंगल घोटणे, मंजुळा गवळी, माधुरी सुळगेकर, अनिता गवळी, तबसुन कल्याणी, सल्लमा पात्रा, रूपा गवळी, लक्ष्मी गवळी, दीपिका गवळी, संध्या गवळी, दीपा गवळी, शोभा गवळी आदी महिला उपस्थित होत्या.
Previous Articleलस द्या, अन्यथा आरोग्य सेतूवरील नोंदणी बंद करा
Next Article मंजुरीकरिता मनपाचा अर्थसंकल्प नगरविकास खात्याकडे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









