प्रतिनिधी /बेळगाव
समर्थनगर विनायकमार्ग येथील एकदंत युवक मंडळ व दुर्गाशक्ती महिला मंडळाच्यावतीने बलिदानमासचे आचरण केले जात आहे. शिवप्रति÷ानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी या मंडळाला भेट दिली.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते अमावस्या या दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी बलिदानमास पाळला जातो. बेळगावच्या अनेक भागामध्ये मोठय़ा संख्येने शिवभक्त एकत्र येऊन बलिदानमास पाळत आहेत. समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळाच्या वतीने मागील काही वर्षांपासून बलिदानमास आचरला जात आहे. परिसरातील शेकडो शिवभक्त रात्रीच्या सामूहिक प्रार्थनेवेळी उपस्थित रहात आहेत.
किरण गावडे यांनी या मंडळाच्या सामूहिक प्रार्थनेवेळी संभाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेऊन शिवभक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, पिंटू, नागेश गावडे, अरुण गावडे, परशराम बेकवाडकर, अशोक खवरे, गिरीष कणेरी, सिद्धार्थ पालटेकर, ऋतुजा गुड्डी, निवेदिता यांच्यासह इतर उपस्थित होते.









