मूर्ती प्रतिष्ठापना व धार्मिक कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी /बेळगाव
समर्थनगर येथील ब्रम्हदेव मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. होमहवन करून ब्रम्हदेवाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प्रकाश पाटील, उमेश बागेवाडी, माजी नगरसेविका वैशाली हुलजी, संतोष कणेरी, मुरली जांगळे, अनंत किल्लेकर, महेश पाटील, वसंत हलगेकर, भगवान जाधव, नागेश गावडे, राम कटारे, मयुर जंगले यांच्यासह समर्थनगर व मल्लिकार्जुननगर येथील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









