टोप / वार्ताहर
सभासद व ऊस उत्पादक शेतकर्यांचा जळालेल्या ऊसाला तात्काळ उसतोड देवुन गाळपासाठी न्यावा अशी सुचना माजी आमदार अमल महाडीक यांनी छत्रपती राजाराम कारखाना शेती आधिकारी यांना दिल्या.
टोप आंब्याचा मळा येथील ११ एकर क्षेत्रातील शनिवारी शॉर्ट सर्किटने जळालेल्या ऊस क्षेत्राला माजी आमदार अमल महाडीक यांनी भेट देवुन ऊसतोड करण्यास सांगितंले.दरम्यान शॉर्टसर्किटने ऊस जळतात या अशा घटना घडु नयेत यासाठी महावितरणने काळजी घेणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या पाठिशी नेहमीच असल्याचेहि महाडीक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी छत्रपती राजाराम सह. कारखान्याचे शेतिआधिकारी बापुसो आवटे, सुगंध वाघ, मुकुंद पाटील ,नागेश पाटील, संतोष पाटील, मा.उपसरपंच विठ्ठल पाटील, आनंदराव पाटील,अरुण पाटील,अक्षय पाटील, निवास चौगले , शिवाजी चौगले, संभाजी चौगले, रोहित चौगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.