हिंदी मीडियममधील अभिनेत्रीची घोषणा
पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने अजीम खान याच्यासोबतचा होणारा विवाह रद्द केला आहे. सबाने स्वतःचा याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. सबा कमरला हिंदी मीडियम चित्रपटात इरफान खानसोबत पाहिले गेले होते. काही काळापूर्वी एक महिलेने अजीमवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
अनेक वैयक्तिक कारणांमुळे अजीम खानसोबतचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता विवाह करणार नाही आहोत. अनेक कटू सत्य समजण्यास विलंब होत नाही. अजीम खानला मी कधीच भेटले नव्हते. आम्ही केवळ फोनवरूनच संपर्कात होतो. हा अत्यंत अवघड काळ असला तरीही त्यातून मी बाहेर पडणार असल्याचे सबाने सोशल मीडियावर नमूद केले आहे.









