
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे कंठीरवा स्टेडियमवर कर्नाटक राज्य बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजित केलेल्या बॉक्सिंग निवड चाचणीतील कामगिरीनंतर आसाम येथे होणाऱया सब ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या पाच बॉक्सर्सची निवड करण्यात आली आहे. निवड चाचणीतनंतर 6 वजनी गटात प्रथमेश गर्डे, 49 वजनी गटात अभिषेक मेहेरवाडे, 55 किलो गटात प्रकाश कोटबागी, 55 किलो मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी धुडूम तर 61 किलो वजनी गटात मंथन फगरे या पाचजणांची आसाम येथे होणाऱया सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. त्यांना अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन मुकुंद किल्लेकर व प्रशिक्षक गजेंद्र त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









