सेन्सेक्स 427 अंकांनी प्रभावीत : बाजारावर चौफेर विक्रीचा दबाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारामध्ये सप्ताहाच्या अंतिम दिवशी शुक्रवारीही सलग चौथे सत्र घसरणीसोबत बंद झाले आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर सेन्सेक्स 427 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. दुसरीकडे जागतिक बाजारांमध्ये चौफर झालेल्या विक्रीच्या प्रभावामुळे भारतीय भांडवली बाजार नुकसानीत राहिल्याचे दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी बजाज फिनसर्व्ह, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत. ट्रेडिंगमधील विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीमधून सलगपणे भांडवल काढून घेण्यात आल्याचा परिणाम हा बाजारातील अन्य कामगिरीवर पडल्याचेही दिसून आले आहे. तर ट्रेडिंगच्या अंतिम क्षणी काही प्रमुख कंपन्यांच्या समभागामधील लिलावामुळे अधिकच्या नुकसानीला काहीसा ब्रेक मिळाल्याचेही दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 427.44 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 59,037.18 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 139.85 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,617.15 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक 5.37 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल, लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फायनान्स आणि इन्फोसिस यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला नफा कमाईत असलेल्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि टीसीएस यांचे समभाग 2.68 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.
जागतिक बाजारांपैकी हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोजिट व जपानचा निक्की यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. युरोपमधील प्रमुख बाजारांमध्ये दुपारी घसरण होती.









