प्रवासी वाहन विक्रीत 26.45 टक्क्यांची वाढ : सियामच्या अहवालामधून आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही महिन्यांपासून वाहन विक्रीमध्ये घसरणीचा प्रवास करणाऱया वाहन क्षेत्रामधून दिलासादायक बातमी आलेली आहे. सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहन विक्रीत 26.45 टक्क्यांची वाढ होत 2.72 लाख युनिटस्वर राहिली आहे. हाच आकडा सप्टेंबर 2019 रोजी 2.15 लाख इतका राहिल्याची नोंद आहे. म्हणजे वार्षिक पातळीवरील आकडय़ाच्या आधारे मागील महिन्यात 56 हजारपेक्षा अधिकची विक्री झाल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स(सियाम) यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यात दुचाकींची विक्री 11.64 टक्क्यांनी वधारुन 18.49 लाखावर राहिली आहे. तर मागील सप्टेंबर रोजी 16.56 लाख राहिली होती. वार्षिक आकडेवारीच्या आधारे हा आकडा 1.92 लाख युनिटपेक्षाही अधिक असल्याचे पहावयास मिळाले आहे.
मोटारसायकलींची विक्री ही 12.24 लाखावर राहिली होती. जी सप्टेंबर 2019 मध्ये 10.43 लाखावर होती. मागच्या तुलनेत मोटारसायकल सेगमेंटमध्ये 17.3 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. यासोबत स्कूटर सेगमेंटमध्ये मागील महिन्यात वर्षाच्या आधारे हलकी वाढ राहिली होती.









