वृत्तसंस्था / मुंबई
देशात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून व्यवहारही बऱयापैकी सुरळीत होताना दिसत आहेत. सप्टेंबरमध्ये इंधन मागणीत 7 टक्के इतकी वाढ झाली आहे. जूननंतरची इंधन मागणीत झालेली ही वाढ चांगली मानली जात आहे.
मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे प्रवास करण्यास निर्बंध घातले गेल्यामुळे इंधनाची मागणी कमी झाली होती. बाहेर जाण्यासंदर्भात बंधने लादली गेल्याने वाहनांचा वापर तुलनेने कमी झाला. महत्त्वाचे म्हणजे बऱयाच राज्यांनी सार्वजनिक वाहतुकीला हिरवा कंदील दिल्यानेही मागणीत फरक जाणवला आहे. आता उद्योग, व्यवसाय भरारी घेताना दिसत असून वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. याचाच असर सप्टेंबरमध्ये मागणीत 7 टक्के वाढीत दिसला. सप्टेंबरमध्ये 15.47 दशलक्ष टन इतकी इंधनाची मागणी झाली होती. मागच्या वषीच्या तुलनेमध्ये सदरच्या समान महिन्यात इंधन मागणीत मात्र 4 टक्के घट दिसली आहे. सप्टेंबरमध्ये अनेक कारखाने सुरु झाल्यामुळे इंधनाची मागणी वाढल्याचे दिसले. येणाऱया काळात इंधन मागणीत वाढ होईल.