मुंबई
ऑटो क्षेत्रात सुटय़ाभागांची निर्मिती करणारी कंपनी सन्सेरा इंजिनिअरिंगचा आयपीओ आज मंगळवार दि. 14 सप्टेंबरला खुला होणार आहे. सदरचा आयपीओ 16 सप्टेंबरला बंद होत असून समभाग विक्रीतून 1282 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. आधीच्या समभागधारक व प्रवर्तकांकडून 17.24 दशलक्ष समभाग ऑफर फॉर सेलसाठी असतील. इश्यूची किंमत 734 ते 744 रुपये प्रति इक्विटी समभाग ठेवण्यात आली आहे.









