ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यात भर पडली आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे राज्यपालांना टोला लगावला आहे.

राज्यपाल हा केंद्र सरकारचा व राष्ट्रपतींचा एक राजकीय एजंट असतात. कारण ते पूर्णपणे राजकीय काम करतात. सध्या देशात फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत. त्यातील एक महाराष्ट्रात व दुसरे पश्चिम बंगालमध्ये आहेत. कारण इथे विरोधकांची केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांची सरकारं आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
नुकतेच, राज्यात मंदिरे खुली करण्यात यावीत या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनीही जशास तसे उत्तर दिले. यावरून सरकार विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष पाहायला मिळत आहे.








