प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ बेशुध्द अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी युवकाचा शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
गुरुवारी लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ सुमारे 30 वषीय अनोळखी युवक बेशुध्द अवस्थेत आढळून आला होता. त्याला 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. 5.5 फूट उंची, काळसर वर्ण, जाड नाक, डोक्मयात काळे केस असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर हाप जिन्स पॅन्ट व निळे टिशर्ट परिधान केले होते. वरील वर्णनाच्या अनोळखी युवका विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405250 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









