मेहरबानी नेमकी कशासाठी ?, अतिक्रमण विभागाला येणार आहे का जाग, सेटलमेंट करतय कोण ?
प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील सदर बाजार परिसरात अनेक अतिक्रमणे कोणाच्या मेहरबानीने झालेली आहेत. त्याचीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. सातारा नगरपालिकेच्या जागेत आणि पाटबंधारेच्या जागेत अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमण धारकांकडून चक्क मंथली घेतली जात आहे. पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग का कारवाई करत नाही याचीच चर्चा सुरु आहे.
सातारा शहरातील सदर बाजार परिसरात पालिकेच्याच जागेत काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. चक्क या अतिक्रमण करणाऱ्यांच्या डोक्यावर काहींची मेहरबानी आहे. मेहरबानीमुळे अतिक्रमणांचे फॅड वाढत आहे. ते अतिक्रमण करणाऱ्या टपरीधारक व गाळेधारकांकडून मंथली वसुल केली जाते, अशी चर्चा आहे. त्यामुळे पालिकेकडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. पाटबंधारे विभागाच्या जागेतही काही टपऱ्या वसलेल्या आहेत. तेथील स्थानिकांकडून ही अतिक्रमणे यांना चालतात कशी अशी चर्चा सदर बाजार परिसरात सुरु आहेत.