पालिकेने सुरू केले काम, बागेत पेव्हर बसवण्याचे सुरू केले आहे काम
सातारा / प्रतिनिधी
पालिकेच्यावतीने सदरबाजारमधील जय जवान हौसिंग सोसायटीच्या लगत असलेल्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज उद्यान 2016-17ला विकसित करण्यात आले होते.मात्र या पावसाळ्यात त्या उद्यानाच्या प्रवेशद्वारा लगतची भिंत पडल्याचे सांगण्यात येते. तीन वर्षात भिंत कशी पडते असा सवाल उपस्थित होत असून या भिंतिचे सध्या काम पालिकेने हाती घेतले आहे.
शहरात सदरबाजार परिसरात चार उद्याने आहे.त्यातील नव्याने दोन उद्याने करण्यात आली आहेत.यातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे उदघाटन 2017 ला उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्यानाचे काम चांगल्या प्रकारे झाले होते. मात्र, उद्यानाला विघ्न संतोषी लोकांचे ग्रहण लागले. उद्यानात पाठीमागून शिरून दारूच्या पार्ट्या होत असत. या पावसाळ्यात त्याची भिंत पडल्याचे स्थानिक सांगतात. सध्या याच भिंतीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांना विचारले असता काम सुरू करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









