सर्वच भागातील अतिक्रमणाचे डोकेवर
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा राबवत आरटीओ कार्यालयाच्या परिसरातील टपऱया हटवल्या. मात्र शहरातील इतर भागात अद्याप कारवाई झालेली नाही. तसेच सदरबझार या भागात विक्रेत्यांचा विळखा घट होत असताना या भागात अतिक्रमण हटावची कारवाई कधी झाली हे शोधण्याची वेळ आली आहे.
शहरात बोकाळलेल्या टपऱया हटवण्यासाठी सोमवारी सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आरटीओ परिसरात कारवाई केली. येथील टपऱया हटवण्यात आल्या. या टपऱया हटवल्या तरी काही भागात अद्याप अतिक्रमण कायम आहे. यांच पार्श्वभूमीवर सदरबझार या भागात टपऱयाचे अतिक्रमण वाढत चालले आहे. सिव्हिल हॉस्पिटल, जुना आरटीओ चौक, सैनिक नगर, जरडेंश्वर नाका येथे विक्रेत्यांनी टपऱया ऐवजी दुकानेच उभी केली आहे. या भागात पालिकेची अतिप्रमण हटाव मोहीम नसते. यांचा फायदा विक्रेत्यांनी घेतला असून एकाच विक्रेत्यांच्या दोन-तीन टपऱया आहेत. या टपऱयाच्या माध्यमातून व्यवसाय तेजीत सुरू आहे. यांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. तसेच वाहतूकीस अडथळा, सांडपाणी रस्त्यावर टाकले जात आहे. यामुळे ऐन कोरोनात शहरात अस्वच्छता निर्माण होत आहे. या टपऱयाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. सातारा नगरपालिका या विक्रेत्यांवर मेहरबान असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नागरिकांच्या तक्रारी नंतरच टपऱया हटवण्यात येणार का असा सवाल उपस्थित होत आहे.








