प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील चर्मालय येथील सदनिकेतून 1 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्या प्रकरणी अब्दुल बासीत अब्दुल्ला साखरकर (28, चर्मालय रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली आह़े पोलिसांनी संशयित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
अरशिया अफताब साखरकर (ओसवालनगर, रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ते 30 ऑगस्ट 2020 दरम्यान अब्दुल साखरकर यांच्या घरातील 72 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने व 30 हजार रूपयांची रोकड चोरीला गेली होत़ी हा प्रकार समोर येताच अब्दुल यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आह़े









