कोरोना संकटामुळे मागील काही दिवसांमध्ये अनेक चित्रपटांचे प्रदर्शन टाळण्यात आले आहे. अभिनेता जॉन अब्राहम याच्या ‘सत्यमेव जयते 2’च्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक विधान प्रसिद्ध करत याची माहिती दिली आहे. यापूर्वी हा चित्रपट 13 मे रोजी ईदवेळी सलमान खानच्या ‘राधेः योर मोस्ट वाँटेड भाई’सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण राधे ईददिनीच चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सत्यमेव जयते 2 हा मिलाप जवेरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट आहे. चित्रपटात जॉनसह दिव्या कुमार खोसला देखील मुख्य भूमिकेत आहे. भूषण कुमार (टी-सीरिज), मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित ‘सत्यमेव जयते’चा हा सीक्वेल आहे.









