मुनव्वर राणा यांच्याकडून गंभीर आरोप
शायर मुनव्वर राण यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल सत्तेसाठी काहीही करू शकतात. कवी कुमार विश्वास यांनी केलेले आरोप सत्य असावेत असे ते म्हणाले.
कुमार विश्वास यांनी केलेले आरोप खोटे असू शकत नाहीत. कुमार विश्वास आणि केजरीवाल यांच्यात दृढ मैत्री होती. काँग्रेसचे सरकार घालविण्यात आणि भाजप सरकार आणणाऱयांमध्ये सर्वात मोठा नायक केजरीवाल हेच आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात हे सर्वजण एकत्र होते. परंतु केजरीवाल यांनी नंतर भाजपलाही फसविल्याचा दावा राणा यांनी केला आहे.
कुमार विश्वास हे अत्यंत विचारपूर्वक बोलत असतात. सध्या माझी त्यांच्याशी फारशी भेट होत नाही, कारण ते माझ्यावर नाराज आहेत असे राणा म्हणाले. मागील आठवडय़ात कुमार विश्वास यांनी केजरीवालांवर फुटिरवाद्यांचा समर्थक असल्याचा आरोप केला होता.









