मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यावे लागेल
प्रतिनिधी/ सातारा
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले कित्येक वर्षे पिचत ठेवला आहे.जे आता सत्तेत आहेत.त्यांनी का सोडवला नाही.वयाने मोठे आहेत.जातीच राजकारण करून सत्ता मिळवली अन मराठा समाजाला वंचित ठेवले,असा आरोप शरद पवार यांचे नाव न घेता करत खासदार उदनराजे यांनी सत्तेत राहायचे आहे ना तुम्हाला. लोकांच्या पुढं जायचं आहे ना तुम्हाला लक्षात घ्या.महाराष्ट्र आहे महाराष्ट्र.इथं मराठा समाज जात म्हणून आहे.मागुन मिळत नसेल तर आता हिसकावून घ्यावे लागेल, असा इशारा ही त्यांनी दिला.
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले,जो पर्यंत मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही.किती दिवस मागायचं आता हिसकावून घ्यायचं
आपण हेच करणार आहोत का?,ज्या वेळेस हे मराठा मोठय़ा प्रमाणावर मोर्चे निघाले त्यात कुठेही हिंसा घडलेली दिसतं नाही.पण किती दिवस तुम्ही या मराठा समाजाचा अंत बघणार.ठीक आहे तुम्ही नाही केलं नाही केलं.त्याच उत्तर तरी दिलं पाहिजे.आपल्या सगळ्यांची पुढची पिढी ती जेव्हा जाब विचारेल कुठल्या तोंडाने शरमेने मान खाली घालावी लागेल.त्यामुळे ह्याच उत्तर त्यांनी दिल पाहिजे.त्यांनी मार्गी लावला पाहिजे आता ते सत्तेत आहेत.त्यांना त्यातली सखोल माहिती आहे.सगळंच माहिती आहे त्यांना आणि त्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न आहेत.एक म्हणजे एवढी वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित का राहिला.दुसरा प्रश्न त्यावेळी सत्तेत असणायांनी का प्रश्न सोडवला नाही.याचे उत्तर द्यावे.मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही.पंतप्रधान यूपी सिंग होते.मंडल आयोग त्यांच्यावेळी लागू केला.ऑगस्ट 1990 साली.मराठा आरक्षणावर भाष्य करणं गरजेच कळू द्या ना.का झालं नाही.इतरांच आधिकार कमी करा असे मराठा समाज कधी म्हणाला नाही.इतर समाजाला न्याय दिला तो योग्यच आहे.मराठा समाजाचे एवढंच म्हणणं आहे प्रत्येकाला न्याय मग आमच्यावर अन्याय का?आणि ज्यांनी अन्याय केला ते सत्तेत होते त्यांनी उत्तर देणे गरजेच आहे.विषयांतर करून चालत नाही.मला आजपर्यंत समजल नाही एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला वेगवेगळे मोर्चे निघतात.हीच लोक प्रोत्साहन करतात तुम्ही पण करा तुमच्यावर गदा येणार.आमचं कोणाचाच म्हणणं नाही की त्यांचे अधिकार काढून घ्या.मराठा समाजाने अस काय पाप केलं.मी सुद्धा विचार करतोय द्यायचं नव्हतं तर कोणालाच द्यायचं नव्हतं.सगळ्यांना देताय आणि याच समाजाला वगळताय का?,आज मला सांगा या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतले लोक येते आहेत.शिवाजी महाराजांनी त्यावेळी मुद्दा काय मांडला होता.सर्व धर्म समभाव आज सगळ्यात मोठ पाप ह्या लोकांनी काय केलं असेल.जाती जातीत तेढ निर्माण करायच काम केलं.सगळे जातीधर्माचे एकजूट राहिले पाहिजेत.आज मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात भावना राहणार ना.दरार, फूट वाढत जाणार कशाकरता.माझी कळकळीची विनंती लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद यात जेवढे मराठा समाजाचे आहेत.पक्ष विरहीत आमदार, खासदार आणि मराठा समाजेतर आमदार, खासदार आहेत.त्या प्रत्येकाची लोक प्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे.कारण मराठा समाज आमदार, खासदार एवढय़ांची जबाबदारी नाही हे.हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पण बाकीचे समाजाचे लोक आहेत त्यांची ही जबाबदारी आहे.त्यांच्या पण मतदार संघात मराठा समाजाचे लोकं आहेत.त्या समाजाने मतदान केलं आहे.आणि नैतिक दृष्टीने हे सोडवणं गरजेच आहे नाहीतर फार मोठा अनर्थ होईल याला जबाबदार ही सगळी असतील.त्याच बरोबर आपल्याला माहीत आहे, परीक्षेसंदर्भात बोलणार आहे.ठीक आहे कोरोनाचे सावट आहे.पण ज्या वेळेस परीक्षा घ्याल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घ्या.आरक्षणाचा ज्या वेळी निकाल लागेल तो लागणारच आहे आज तसं जर झालं नाही तर न्याय व्यवस्थेकडे आपण ज्या आशेने बघतो त्याचा निराश होईल.कधी न्याय मिळणार एक दोन तीन चार टर्म पेक्षा जास्त निघून गेले.प्रश्न तसाच आहे.अस असताना हे लोक म्हणत असतील मराठय़ांचे आम्ही कैवारी आहोत, मराठा स्ट्रॉंग मॅन, ही उपमा कितपत लागू होते.काही मागितले नाही आपल्या लोकांकडून. ही मोठी लोकं आहेत.वयान मोठं आहेत.तुमच्यासारख्या मतदारांनी मतदान केलं पदावर बसवलं.म्हणून मोठी आहेत कोण आमदार झालं कोण कोण खासदार झालं कोण मंत्री झालं.पण त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे ज्या लोकांनी मान दिला मानपान दिला.तुम्हाला सन्मान दिला.तुमच्यावर विश्वास ठेवला.विश्वास उडाला तर हीच लोकं तुम्हाला खाली खेचू शकतात.ही लोकशाही.हित कोण मोठं कोण छोट नाही.वयाचा आदर असणार आहे तो नेहमीच आहे निदान तरुणांच्या एवढय़ा प्रश्नाचं उत्तर देणे गरजेचे आहे.आणि मला एक समजत नाही साधं इथलं कुठलं कोर्ट म्हणतात डिस्ट्रिक कोर्ट, तिथं पण तारीख मिळते की नाही सेशन कोर्टची तीच परिस्थिती हायकोर्टाची तीच मग सुप्रीम कोर्टाची वेगळी पद्धत आहे का मला माहीत नाही.सर्वोच्च न्यायालयाने तारीख दिली तारीख माहीत आहे आणि त्या तारखेला राज्य शासनाने दिलेला वकील तो हजर राहत नाही ज्या वकिलाला फी देता. लोकांच्या पैशातून.तुम्ही हजर राहत नाही.सुप्रीम कोर्टाचे वकील हायली लरनेड असतात ते हजर राहत नाहीत.जे कमिटीचे नेमणूक झाली त्यांनी ही खुलासा केला नाही.नाव घेऊन कोणाला मोठं करणार नाही कारण सगळे दोषी.आपण दुस्रयाकडे बोट दाखवतो पण आपल्याकडे बोट असतात.करायचे नाही तर लोक बाहेर निघू देणार नाहीत.कोरोना आहे म्हणून लोक शांत आहेत.किती वेळ लागतो.स्प्रिंग दाबत गेला तर सटकते.रिऍक्शन तर होणारच उद्रेक घडला तर जबाबदार कोण?जे नुकसान होणार त्याला ही लोक जबाबदार असणार आहेत.निवडणूक येतात आश्वासन दिले जाते.काय कधी नाव ठेवतात. निदान, जणांची नाहीतर मनाची लाज राखली पाहिजे.प्रत्येक ठिकाणी जात जात जात.जातीच राजकारण करायचं असेल तर मेहरबानी करून राजीनामा द्या आणि घरी बसा.जाती जातिमध्ये तेढ निर्माण करू नका.हा ह्या पक्षाचा तो त्या जातीचा.किती दिवस चालणार आहे हे काहीतरी इशु बेस पोलिटिक होणार आहे की नाही.वेळ मारून नेऊन सत्तेच पोलिटिक होणार आहे.शेवटी विचार करणं गरजेच आहे नाव ठेवतात.देवेंद्र फडणवीस तो आपल्याच वयाचा आहे ना.केलं ना त्यांनी आरक्षण टिकवन त्याला नाव ठेवायची.ठीक आहे सत्तातंर झालं तुम्ही सत्तेत आला मग करा ना का केलं नाही.वकिलच गायब करून टाकला तुम्ही कमाल आहे.एवढा मोठा प्रश्न आहे आणि किरकोळ कारण मराठा समाजाला.सत्तेत राहायचे आहे ना तुम्हाला. लोकांच्या पुढं जायचं आहे ना तुम्हाला लक्षात घ्या.महाराष्ट्र आहे महाराष्ट्र.इथं मराठा समाज जात म्हणून आहे.आणि ती निर्णायक जात आहे.माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला.जातीतील कोणताही उमेदवार असो त्याच्याकडून आश्वासन घ्या की हा प्रश्न तडीस लावणार तरच आम्ही तुमच्याबरोबर आहोत.नाही तर काय करायचं.उगीच आपलं मतदान करायचं.थोडा फार विचार करणं गरजेचं आहे.एवढा कुबट वास येतोय बोलायचं नाही.माझ्यापरीने मी मराठा आरक्षणाबद्दल बोलत आलो आहे.जे बोलतो ते स्पष्ट बोलतो.इतर समाजावर अन्याय झाला तरीही तितकीच बाजू मांडत आलो आहे.








