प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. वकिलांशी कुठल्याही स्वरुपात चर्चा नाही. सरकारकडून त्यांना योग्य सूचना होत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला. 8 मार्च पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. या पार्श्वभमूवीर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आम्ही पुन्हा सत्तेवर आलो तर मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, यापूर्वी कायद्याच्या चौकटीत बसवून आम्ही आरक्षण दिले, उच्च न्यायालयाने मान्य केले. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली, आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे असे झाले. आम्ही सत्तेवर आलो तर कायदेशीरदृष्ट्या टिकणारे आरक्षण देवू. आमच्या हाती काही जादूची कांडी नाही. पण योग्यपणे अभ्यास करुन टिकणारे आरक्षण देऊ.
कोरोनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार
शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱयांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिलाचा प्रश्न, अवकाळीची नुकसान भरपाई अशा विविध विषयावर सभागृहाला सरकारला अधिवेशनात जाब विचारणा आहे. हे सर्व विषय विरोधी पक्षाच्या अजेंडÎावर आहेत. पण कोरोना महामारीच्या कालावधीत झालेल्या साहित्य खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. तो जनतेच्या कष्टाचा पैसा आहे. सभागृहात हा भ्रष्टाचा चव्हाट्यावर आणणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने कर कमी केले तर पेट्रोल दर निश्चित कमी होतील त्याहीपेक्षा पेट्रोल, डिझेल जीएसटीखाली आणल्यास दर कमी होतील. असेही त्यांनी एका प्रश्नवर भूमिका मांडली.