सावंतवाडी प्रतिनिधी-
स्वच्छ सुंदर सावंतवाडी शहराला विद्रुपीकरण करण्याचे काम सध्या सावंतवाडी पालिकेतील सत्ताधारी भाजप करत आहे. मोती तलावाच्याकाठी आठवडा बाजार भरून एक झोपडपट्टीची वसाहत केली आहे. त्याचबरोबर मोती तलावाच्या पाण्याला पूर्णपणे दुर्गंधी येत आहे. शहरात बाजारपेठेत अनाधिकृत स्टॉलना अभय अशा तर्हेने सुंदर सावंतवाडीचे रूपच बदलून टाकण्यात आले आहे. सुंदर स्वच्छ सावंतवाडी कायम ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ही स्वच्छ सुंदर सावंतवाडी टिकवण्यासाठी आमची धडपड आहे. सावंतवाडी शहराचा बारामती पॅटर्ननुसार विकास केला जाणार आहे. या शहरात रोजगारभिमुख भव्यदिव्य प्रकल्प उभारण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाच्या बाबतीत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात येत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग-व्यापार हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग-व्यापार दर्शना बाबर देसाई, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, युवती तालुकाध्यक्ष जहिरा ख्वाजा, महिला शहराध्यक्ष सौ. रंजना निर्मळ, अल्पसंख्यांक सरचिटणीस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, असिफ ख्वाजा, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका सदस्य संतोष जोईल, अर्शद बेग.आदी उपस्थित होते