वाळपई / प्रतिनिधी :
गोळावली सत्तरी येथील वाघांच्या मृत्युनंतर निर्माण झालेली गंभीर परिस्थिती यामुळे सत्तरी तालुक्मयातील धनगर समाज बांधव पूर्णपणे असुरक्षित झालेला आहे. त्यामुळे सरकारने या समाजाला अभय देणे अत्यंत गरजेचे आहे .वाघाच्या मृत्यूनंतर गोळवली धनगरवाडा येथील चार कुटुंबातील सर्व जणांना अटक केल्यामुळे त्याच्या कुटुंबासह फार गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली असून त्यांना सरकारने आता अभय देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मागणी सत्तरी गोवा धनगर समाज सेवा संघ यांच्यावतीने वाळपईत आज रात्री घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाज संघटनेने आतापर्यंत सत्तरीतील धनगर समाजाकडे सरकारच्या माध्यमातून सर्व प्रकारचे दुर्लक्ष झालेले असून यामुळे या समाजासमोर निर्माण झालेली गंभीर परिस्थिती त्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असून या अहवालामध्ये निर्माण झालेली परिस्थिती या संदर्भातील माहिती देण्यात येणार असल्याची यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलेले आहे.
समाज संघटनेचे अध्यक्ष बि डी मोटे सचिव पवन वरक बिरो जानू काळे व संघटनेचे संस्थापक सभासद तथा माजी अध्यक्ष बाबू हुमाणे यांची खास उपस्थिती होती .नागवे याठिकाणी सदर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
वाघाच्या मृत्यूने धक्का.
धनगर समाज हा पूर्णपणे नैसर्गिक संपत्ती राहणार आहे. गाईगुरे यांचा दुधाचा धंदा करीत असताना त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी या समाजावर आतापर्यंत आलेली आहे. गोळवली धनगर वाडा येथील धनगर समाजाचे बांधव 1961 सालापासून त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही मंडळी सदर ठिकाणी आपले जीवन व्यथित करीत आहेत. ज्यावेळी वाघाचा मृत्यू झाला व याप्रकरणात पावणे कुटुंबियातील पाच जणांना अटक करण्यात आली. यावेळी धनगर समाज संघटनेला मोठा धक्का बसला आहे. निसर्गाची सेवा करणारा हा बांधव या वाघांची कशाप्रकारे हत्या करू शकतात यासंदर्भात या समाज संघटनेने पूर्णपणे खेद व्यक्त केला आहे. समाज संघटना संशयित आरोपींची पाठराखण अजिबात करणार नाही मात्र या प्रकरणात सरकारने पारदर्शक प्रमाणात चौकशी करावी अशा प्रकारची या संघटनेची मागणी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.









