संरक्षण कुंपण नसल्याने जनावरे, नागरिकांसाठी ठरू शकतात जीवघेण्या
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील चिरेखाणी या नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत आहे?त. ??या चिरेखाणींच्या भोवती संरक्षण कुंपण नसल्याने जनावरे व नागरिकांसाठी या खाणी धोकादायक ठरत आहेत. संबंधित चिरेखाण मालकांनी चिरेखाणीच्या भोवताली संरक्षण कुंपण उभारण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.
सत्तरी तालुक्मयाच्या अनेक पंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हा बेकायदा व्यवहार सुरू असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढत आहे. हा बेकायदेशीर व्यवसाय नागरिकांसाठी धोक्मयाचा ठरत असून तो बंद करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली, मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाणी भरल्यामुळे धोका वाढला
सध्या पावसामुळे चिरेखाणीचे उत्खनन काम बंद आहे. मात्र चिरेखाणींचे खंदक पाण्याने तुडुंब भरले आहेत. या पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे जनावरे व नागरिकांसाठी सदर चिरेखाण धोकादायक ठरण्याची शक्यता.
नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा अधिवेशनात अशा बेकायदा चिरेखाणींचा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर सरकारतर्फे या चिरेखाणींच्या भोवती संरक्षण कुंपण उभारण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सत्तरी तालुक्मयातील जवळपास सर्व चिरेखाणी धोकादायक असून त्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.
सरकारी जमिनीत चिरे उत्खनन
अनेक सरकारी जमिनीमध्ये चिऱयाखाणींचा व्यवसाय सुरू आहेत. यापूर्वी अनेकवेळा स्थानिक अधिकाऱयांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. सरकारच्या मालकीच्या जमिनीवर चिरेखाणी चालविणे हा गुन्हा आहे?. मात्र अजूनपर्यंत सरकारी यंत्रणेने कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.









