वाळपई / प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्मयातील सरकारी यंत्रणेचे काम यासंदर्भात सरकारने म्दन्ग्d-19 या कामासाठी नियुक्त केलेल्या आयएएस अधिकारी कुणाल व भोजन व निवासस्थानाचे व्यवस्था प्रमुख श्री. कबीर
यांनी नुकतीच खास बैठक घेऊन यासंदर्भात संपूर्णपणे आढावा घेतला. सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर मामलेदार अनिल राणे सरदेसाई संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर सत्तरी तालुक्मयातील गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे वाळपई सामाजिक आरोग्य खात्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन नाईक पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांची खास उपस्थिती होती. त्यानंतर संबंधित खात्याचे अधिकाऱयांसमवेत आयएएस अधिकारी कुणाल उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर व इतरांनी सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी भेटी देऊन या संदर्भातील अप्रत्यक्षपणे पाहणी करण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची माहिती अशी की सध्या जागतिक स्तरावर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यांच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने तीन मे पर्यंत पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आलेले आहे. यामुळे परप्रांतीय मजुरांची व्यवस्था या संदर्भात सरकारने वेगवेगळय़ा प्रकारच्या सुविधा त्यांना प्राप्त केलेल्या आहेत. सदर सुविधांचा लाभ खरोखरच या परप्रांतीय मजुरांना मिळतो का यासंदर्भात याअधिकाऱयांनी खास करून वाळपई नगरपालिकेच्या सय्यद नगर होंडा व पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमधील वेगवेगळय़ा आस्थापनात काम करणारे परप्रांतीय मजूर याठिकाणी खास भेट देऊन त्यांचे विचारपूस केली. सरकारतर्फे यामजुरांना मोफत जेवणाची व्यवस्था व जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात सविस्तरपणे आढावा याबैठकीमध्ये घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यांनी सांगितले की एकूण सर्व व्यवस्थेची पाहणी करणे व त्या संदर्भात आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आयएएस अधिकारी श्री कुणाल यांची सरकारने नियुक्त केलेली आहे. त्यांनी यासंदर्भात सत्तरी तालुक्मयाच्या पूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. खासकरून परप्रांतीय मजुरांना खरोखरच सरकारने दिलेल्या सुविधा प्राप्त होतात का या संदर्भात आढावा त्यांनी घेतल्याचे गावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीनंतर वाळपई नगरपालिका क्षेत्रातील सय्यदनगर होंडा पिसुर्ले व औद्योगिक क्षेत्रात वास्तव्य करणारे परप्रांतीय मजूर यांची प्रत्यक्षपणे भेट घेऊन त्यांची विचारपूस केल्याचे त्यांनी स्पष्ट केले . एकूण बैठकीच्या आढाव्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयांमध्ये परप्रांतीय मजूर व त्यांना जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित खात्याच्या प्रमुख अधिकाऱयाकडून यासंदर्भाची पूर्ण माहिती प्राप्त करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयात होम कोरोन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या व त्यांचे सद्यस्थिती यासंदर्भात आढावा यावेळी घेण्यात आल्याचे गावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याप्रमाणे सत्तरी तालुक्मयातील ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱया सुर्ला याठिकाणी जीवनावश्यक वस्तू यासंदर्भाची सविस्तरपणे माहिती ागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयाकडून प्राप्त करून घेण्यात आली व सदर गावांमध्ये खास भेट देऊन यासंदर्भात पूर्णपणे आढावा घेण्याचे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून अधिकारी कुणाल नागरी पुरवठा अधिकाऱयांना दिल्याचे गावकर यांनी यावेळी सांगितले.









